भुवनेश्वर – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अधिकार्यांनी सांगितले की, काल शुक्रवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान पुरीपासून अग्नेय दिशेस अंदाजे ७० कि.मी अंतरावर आणि गोपाळपूर पासून पूर्वेस १३० कि.मी अंतरावर हा पट्टा तयार झाला आहे. परिणामी मुसळधार पावसासह ओडिशाच्या किनारपट्टीवरील भागात त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशातील उत्तरेकडील भागात आणि पश्चिम बंगालच्या काही भागात ताशी ६० कि.मी. वेगाने वारे वाहू शकतात. राज्यातील मलकानगिरी,कोरापुट,
रायगडा,गंजम,गजपती,
नयागड,नबरंगपूर,नुआपाडा आणि कालाहंडी आदी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.