सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या कैरन्स मधील हिल्टन डबल ट्रि हॉटेलच्या गच्चीवर एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात पायलटचा मृत्यू झाला आहे.
आज पहाटेच्या सुमारास एक हेलिकॉप्टर हॉटेलच्या रुफ टॉपवरुन जात असतांना अचानक त्यात बिघाड झाला व ते कोसळले. हेलिकॉप्टरचे भाग इतस्ततः विखुरले. हेलिकॉप्टरच्या पंख्याचे एक पाते हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पडले. त्यानंतर तातडीने हॉटेलमधील पाहुण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या अपघाताचा तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांसह विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ अपघाताच्या कारणांचा शोध घेत आहेत.