न्यूयॉर्क – 13 मार्चला होणाऱ्या ऑस्कर पुरस्काराच्या सोहळ्यात आरआरआर चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्याला नामांकन मिळाले आहेच त्यासोबत या ऑस्कर सोहळ्यात नाटू नाटू गाण्याचे लाइव्ह सादरीकरण होणार आहे. त्यामुळे आता या सादरीकरणावर भारतीयांचे लक्ष लागणार आहे.
ऑस्कर अकादमीने ट्विट करत याबाबत घोषणा केली. या ट्विटमघ्ये म्हटले की,‘नाटू नाटू95 व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारात लाइव्ह सादरीकरण करणार आहे.
संगीतकार एमएम कीरावानी सध्या या सोहळ्यासाठी लाइव्ह सादरीकरणाची तयारी सुरू केली आहे. मात्र या गाण्यातील अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हे स्टेजवर दिसणार का, ते या गाण्यावर नाच करणार का याबाबत कोणीतही अधिकृत माहिती नाही. नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळाल्यामुळे हे गाणे भारताला ऑस्कर मिळवून देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’