ऑडी इटलीचे मालक फॅब्रिझियो लोंगोंचा गिर्यारोहण करताना दरीत पडून मृत्यू

रोम – ऑडी इटलीचे मालक फॅब्रिझियो लोंगो यांचा गिर्यारोहण करत असताना पर्वतावरून पडून मृत्यू झाला आहे. ऑडीच्या इटली येथील ऑपरेशन्सचे प्रमुख असलेले ६२ वर्षीय फॅब्रिझियो लोंगो इटली-स्विस सीमेजवळील माउंट एडेमेलो पर्वतावर चढत असताना १०,००० फूट उंचीवरून खाली कोसळले. अपघाताच्या वेळी ते शिखराच्या अगदी जवळ होते, अशी माहिती न्यूयॉर्क पोस्टने दिली आहे.

लोंगो यांच्या एका सहकारी गिर्यारोहकाने बचाव पथकाला याबाबतची माहिती दिली. लोंगो यांचा मृतदेह ७०० फूट खोल दरीत सापडला. तेथून हेलिकॉप्टर रिट्रीव्हल टीमने त्यांचा मृतदेह बाहेर काढला आणि तपासणीसाठी कॅरीसोलो येथील रुग्णालयात पाठवला.

दुर्घटनेवेळी फॅब्रिझियो लोंगो स्टीलच्या केबल्स आणि पायऱ्यांसह विविध सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज होते. तरी ही दुर्घटना कशी घडली, तेव्हा नेमके काय घडले हे अद्याप समोर आलेले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top