मुंबई- मध्य रेल्वेवरील दादर- बदलापूर एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान ही एसी लोकल बंद पडली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ही लोकल एकाच ठिकाणी थांबल्यामुळे त्यामागे दोन लोकल देखील थांबल्या होत्या. या सर्व प्रकारामुळे मध्ये रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तातडीने हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर अर्ध्या तासाने लोकल सेवा पुन्हा सुरळीत झाली.
एसी लोकल बंद पडली! मध्य रेल्वे विस्कळीत
