एसी बिघडल्याने पश्चिम रेल्वेच्या ७ एसी लोकल रद्द

मुंबई:

विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमधील एसी अचानक बिघडल्याने नारिकांना नाहक त्रास झाला. वसई, भाईंदर आणि मीरा रोडला ही एसी लोकल वारंवार थांबवल्याने इतर लोकलच्या वाहतुकीवर त्यांचा परिणाम झाला. पश्चिम रेल्वेच्या ७ एसी लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळे दुपारच्या वेळीच एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.

द गुरूवारी मध्य रेल्वेवर कळवा ते मुंब्रा दरम्यान एक एसी लोकल मध्येच थांबली. त्यानंतर लोकलचे दरवाजेही उघडत नसल्याची घटना घडली होती. या लोकलमधील एसीसुद्धा बंद पडली. दोन दिवसांत दोन वेलळा एसी लोकलमध्येच बिघाड झाल्याची घटना घडल्याने एसी लोकलच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top