मुंबई – राज्य परिवहन महामंडळने एसटी तिकिट दरात आजपासून १४.९७ टक्के वाढ केली. रिक्षा व टॅक्सीचीही १ फेब्रुवारीपासून ३ रुपये भाडेवाढ लागू होणार आहे. त्यामुळे रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये तर टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपये होणार आहे. प्रवासी दरवाढीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, डिझेल, सिएनजी, एसटीचे सुटे पार्ट इत्यादी महाग झाल्याने ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षी ही दरवाढ अपेक्षित असते. मात्र मागील तीन वर्षापासून ही दरवाढ झाली नव्हती. परिणामी आता दरवाढ केली आहे.
एसटी, रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ
