यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील माणोली – दहेगाव परिसरात एसटी आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही बस किनवटवरून घाटंजीमार्गे यवतमाळ कडे जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. यामध्ये जळका तालुका राळेगाव येथील रहिवासी नंदू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातावेळी बसमध्ये जवळपास ८८ प्रवासी होते. त्यापैकी काही किरकोळ जखमी झाले.
एसटी-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
