एसटी चालकाला फिट ३५ ते ४० प्रवासी जखमी

सोलापूर – एसटी चालकाला फिट आल्याने त्याचे एसटीवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे एसटी रस्त्याजवळील शेतात पलटी झाली. या अपघातात ३५ ते ४० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर कुर्डुवाडी येथील सरकार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर हा अपघात झाला.

सोलापूर येथील टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावरून एसटी बस जात होती. बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. त्यात महिला आणि वृद्ध प्रवासी मोठ्या प्रमाणात होते. प्रवास सुरू असतानाचा बसच्या चालकाला फिट आली. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी शेतात जाऊन पलटी झाली.

अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवासी घाबरले. काही प्रवासी स्वतःचा बचाव करत बसमधून बाहेर आले. अपघात झाल्याचे दिसताच महामार्गावरील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. त्यांना शेतातील मोकळ्या जागेत बसवण्यात आले. त्यानंतर एसटीच्या चालकालाही बाहेर काढण्यात आले. चालकाला शुद्धीवर आणण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिक सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top