वैभववाडी -एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पाससंदर्भात ‘ एसटी पास थेट शाळेत ‘ या योजनेची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती.आता या योजनेचा शुभारंभ नुकताच वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालयात करण्यात आला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांंना एसटीच्या तिकिट पासासाठी बसस्थानकात जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी एसटीचे पास थेट शाळेत वितरित वितरित करण्याच्या सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या होत्या.त्यानुसार वैभववाडी वाहतुक नियंत्रक भागोजी गुरखे यांच्या उपस्थितीत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या विद्यालयात हे पास वितरित करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे,मुख्याध्यापक बी.एस.नादकर आणि शिक्षक आणि लाभार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या