Home / News / एसटीची दिवाळी भाडेवाढ रद्द

एसटीची दिवाळी भाडेवाढ रद्द

मुंबई -दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करते. ही भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई -दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करते. ही भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू असते. त्यातून एसटीला दिवसाला सुमारे २३ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळते. यंदादेखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या एका महिन्यासाठी एसटीने ही भाडेवाढ लागू केली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळाने ही भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील एसटी प्रवाशांचा फायदा होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या