मुंबई – नियमित सुनावणीसाठी न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नवी मुंबई पोलीस आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले आरोपी अॅड सुरेंद्र गडलिंग यांनी न्यायालयाकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी याच मुद्यावरून एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या सात आरोपींनी तळोजा कारागृहात आमरण उपोषण केले होते. कारागृह प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. गुरुवारी या आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी अॅड सुरेंद्र गडलिंग यांनी न्यायालयात एक अर्ज दाखल करून पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली.