केपटाऊन -महिला टी २० वर्ल्डकप मध्ये इंग्लंडने आयर्लंडचा ४ गडी राखून पराभव केला. विशेष इंग्लंडने ६ षटके राखून हा विजय मिळवला. आयर्लंडकडून गैबी लुईस हिने ३७ चेंडूत ३६ धावा केल्या पण आपल्या संघाचा पराभव टाळू शकली नाही.
आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना १०५ धावा केल्या होत्या या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंच्या फलंदाजांनी सुरुवाती पासूनच आक्रमक फलंदाजी केली पण त्यात त्यांच्या६ विकेट्स पडल्या पण एलिस कॅप्सी हिने आयर्लंडच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवत २२ चेंडूत ५१ धावा फाटकावल्या आणि आपल्या संघाचा विजय सुनिश्चित केला तिच्या याच अर्धशतकामुळे इंग्लंडला आयर्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवता आला. आयर्लंडकडून केरा मूर हिने १५ धावात ३ बळी घेतले. तर प्रेन्डर ग्रास्ट हिने १३ धावात १ बळी घेतला पण एलिसला मात्र त्या रोखू शकल्या नाहीत . त्यामुळेच आयर्लंडला पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंड आता ग्रुप बी मध्ये आघाडीवर आहे
एलिस केपसीचे झंझावाती अर्धशतक इंग्लंडचा आयर्लंडवर धमाकेदार विजय
