मुंबई – भारतीय विमा महामंडळाने आयडीएफसी फर्स्ट बॅकेतील आपला हिस्सा वाढवला आहे. शेअर बाजारातील कालच्या आकडेवारीनुसार एलआयसीचा आयडीएफसी बँकेतील हिस्सा ०.२० टक्क्यावरून २.६८ टक्क्यांवर गेला आहे. या टक्केवारीनुसार आयडीएफसी बँकेतील एलआयसीच्या समभागांची संख्या १ कोटी ४२ लाख १ हजार ८४४ वरुन २० कोटी २ लाख ३६ हजार ८८४ वर पोहोचली आहे. त्यामुळे एलआयसीची आयडीएफसी फर्स्ट बँकेतील गुंतवणूक आता १५० कोटी रुपये झाली आहे.
एलआयसी ने वाढवलाआयडीएफसी बँकेतील हिस्सा
