एलआयसीची ६५ कोटींची जीएसटी थकबाकी

रांची – भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीला वस्तु व सेवाकर (जीएसटी) विभागाने ६५ कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस बजावली आहे. झारखंड मधील २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ही थकबाकी असून साडेसहा कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.एलआयसीच्या केवळ झारखंडमधील तत्कालिन व्यवहारासाठी काल ही नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये जीएसटीची रक्कम व त्यावरील साडेसहा कोटी रुपयांचा दंड व व्याज असे मिळून त्यांना एकंदरीत ६५ कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यावर एलआयसीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top