वॉशिंग्टन
एरिक गार्सेट्टी यांनी आज भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून शपथ घेतली. त्यानंतर गार्सेट्टी हे एक वचनबद्ध लोकसेवक आहेत. ते भारतीयांसोबतची आमची भागीदारी मजबूत करण्याची भूमिका बजावतील, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी दिली.
अमेरिकेच्या संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीने भारतातील राजदूत पदासाठी लॉस एंजलिसचे माझी महापौर असलेल्या गार्सेट्टी यांच्या नावाला मंजुरी दिली होती. तर अध्यक्ष जो बिडेन यांनी याबाबतचा प्रस्ताव समितीकडे पाठवला होता. जानेवारी २०२१ पासून भारतात अमेरिकेचा एकही राजदूत नव्हता. या २ वर्षांच्या कालावधीनंतर अखेर अमेरिकेने भारतात आपला स्थायी राजदूत नियुक्त केला. दरम्यान, डेमोक्रॅटच्या सर्व सदस्यांनी गार्सेट्टी यांच्या बाजूने मतदान केले होते. राजदूतासाठी एकूण ५२ मते पडली. त्यापैकी ४२ मते गार्सेट्टी यांच्या बाजूने होती. सर्व डेमोक्रॅट, रिपब्लिकन सिनेटर टॉड यंग आणि बिल हर्टी यांनीही गार्सेट्टी यांच्या बाजूने मतदान केले होते.