जळगाव – जळगावमधील एरंडोल तालुक्यात खासगी बसचा अपघात झाला. ही घटना आज सकाळी ८.३०च्या सुमारास पिंपळकोठा गावाजवळ घडली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. यापैकी ४ जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील तीन जणांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही बस राजस्थानकडून जळगावमार्गे औरंगाबादकडे जात होती. यावेळी पिंपळकोठाजवळ एका लहान पुलाच्या कठड्यावर बस धडकली आणि खाली कोसळली. यात चालकासह एक जण मृत्युमुखी पडला.