जिन्हिव्हा – जागतिक आरोग्य संघटनेने कांगो आणि आफ्रिकेतील एमपॉक्सचा उद्रेक ही जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केला आहे.डझनाहून अधिक देशांमध्ये मुले आणि प्रौढांमध्ये या व्हायरसची लागण झाली आहे. विषाणूचा हा प्नकार नवीन असून आफ्रिकेत लसीचे मोजकेच डोस उपलब्ध आहेत.
जगभरात मंकीपॉक्स म्हणजेच एम पॉक्स व्हायरस गतीने पसरत आहे.गेल्या काही दिवसापासून या विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.या विषाणूमुळे आरोग्य विभाग व नागरिक चिंतेत आहेत.या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून जागतिक आरोग्य संघटना आणि सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने यावर चिंता व्यक्त केली आहे.एमपॉक्सचा कहर पाहून आफ्रिकेत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.जागतिक आरोग्य संघटनेने आपत्तकालीन बैठक बोलावून हा निर्णय घेतला.
वर्षभरात एमपॉक्स व्हायरसचे १५ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत.तर भारतात या विषाणूचे आतापर्यंत २७ रुग्ण आढळले आहेत.या व्हायरसमुळे ४६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एमपॉक्सचे क्लेड १ आणि क्लेड १ बी नावाचे दोन उपप्रकार आहेत.अन्य विषाणूंच्या तुलनेत एमपॉक्स वेगाने पसरतो. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या व्हायरसच्या प्रसारात १६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.