पुणे – वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ आल्यामुळे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-ब(अराजपत्रित)सेवा संयुक्त परीक्षा आणि गट-क परीक्षेसाठी पात्र ठरणार्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे ५ जानेवारीला होणारी गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही २ फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर २ फेब्रुवारीला होणारी गट- क सेवा पूर्व परीक्षा ही ४ मे रोजी होणार आहे.आयोगाच्या यंदा संयुक्त परीक्षेची जाहिरात येण्यास ९ महिन्यांचा उशीर झाला. त्यामुळे ५५ ते ६० हजार उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडल्याने उमेदवारांना फटका बसला. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना ६ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. दोन्ही परीक्षांसाठी नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |