Home / News / एटीएम चावीचा वापर, दीड मिनिटात १० लाख लंपास व्हिडीओ व्हायरल

एटीएम चावीचा वापर, दीड मिनिटात १० लाख लंपास व्हिडीओ व्हायरल

पुणे – मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएमच्या चावीचा वापर करून, अवघ्या १ मिनिट २८ सेकंदात १०...

By: E-Paper Navakal

पुणे – मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएमच्या चावीचा वापर करून, अवघ्या १ मिनिट २८ सेकंदात १० लाख ८९ हजार ७०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, समाजमध्यमावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चोरट्यांनी एटीएम न फोडता,कोणत्याही शस्त्राचा वापर न करता, एटीएमच्या चावीचा वापर करून ही चोरी केली. या चोरीत २ व्यक्तींचा सहभाग असल्याचे व्हिडीओत दिसते. दोघांनी काही वेळ आजूबाजूचा कानोसा घेतला. त्यानंतर एका व्यक्तीने चावीच्या सहाय्य्याने एटीएमचा दरवाजा उघडला. त्याने एटीएम मधील लॉकचा पासवार्ड टाकून रोख १० लाख ८९ हजार ७०० रुपयांची रक्कम काढून घेतली व फरार झाले. दरम्यान परिसरात या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली. तसेच पौड पोलिस ठाण्यात प्रवीण बुटाला यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसपथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या