नवी दिल्ली- एजंट नमो-मित्रासाठी काहीही करेल, असे पोस्टर कॉंग्रेसने एक्सवर पोस्ट केला आहे. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे छायाचित्र आहे. यावर लूट प्रॉडक्शन प्रस्तुत करत एजंट नमो, याचे दिग्दर्शक मोदानी आहेत. आणि यामधील गाण्याचे नाव गोदिया आहे, असा मजकूर लिहिला आहे.
पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील संबंधांबाबत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना आता केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांच्या नव्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनीच गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात या मला अदानीची ओळख करून दिली. या विधानानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर आरोप केला आहे की, नरेंद्र मोदी हे अदानीच्या एजंटसारखे काम करत आहेत.