मुंबई : देशातसध्या एच३एन२ एन्फ्लुएन्झाचा संसर्ग वाढत आहे. याबाबत आज राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षेतेखाली आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. एक ते दीड तास ही बैठक चालू होती. यात राज्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिले. आरोग्य अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. शिवाय राज्यातील प्रमुख रहदारी असलेली शहरे मुंबई, ठाणे, पुणे अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र राज्यात अद्याप कोणतेही निर्बंध घालण्यात नसेल तरीही, जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्याचे पालन करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. डब्लूएचओने सांगितल्याप्रमाणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, डोळ्यांना आणि नाकाला वारंवार हात लावू नये. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकून ठेवा. इन्फ्लुएंजाचा संसर्ग झाल्यास ताप, सुखा खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, घसा खवखवणे तसेच, नाकातून पाणी येणे, अशी लक्षणे जाणवतात
एच३एन२ संसर्गाचा उद्रेक