‘एचएएल’ कंपनीतील हिस्सा विक्रीला
केंद्राला २,८६७ कोटी रुपये मिळणार

नवी दिल्ली :

केंद्र सरकार ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील ३.५% (११,७०३,५६३ शेअर्स) पर्यंतचा हिस्सा विकणार आहे. यासाठी फ्लोअर प्राईज २,४५० रूपये निश्चित करण्यात आली. ही किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा ६.६ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे एचएएलचे शेअर्स दोनच दिवसांत १२ टक्क्यांनी कोसळून २,५०० रुपयांवर आले आहेत. यातून सरकारला २,८६७ कोटी रुपये मिळणार आहेत.

एचएएल ही एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे. तिचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. ही कंपनी जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. भारतीय हवाई दलाची दोन तृतीयांश वर्कहॉर्स विमाने एचएएलची आहेत. हलके लढाऊ विमान तेजसची निर्मितीही याच कंपनीने केली आहे. एचएएलची निर्गुंतवणूक २०१८ मध्ये सुरू झाली. या वर्षी एचएएलने आपला आयपीओ जारी केला होता. यानंतर, एचएएलमधील सरकारची हिस्सेदारी १०० टक्क्यांवरून ८९.९७ टक्क्यांपर्यंत खाली आली. यातून सरकारला ४,२२९ कोटी रूपये मिळाले होते.

Scroll to Top