Home / News / एकनाथ शिंदे म्हणजे गोमातेचे पुत्र! अविमुक्तेश्वरानंदाकडून स्तुतिसुमने

एकनाथ शिंदे म्हणजे गोमातेचे पुत्र! अविमुक्तेश्वरानंदाकडून स्तुतिसुमने

भाईंदर – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत तोवर शांतता मिळणार नाही असे म्हणत, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आशीर्वाद देणारे स्वामी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

भाईंदर – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत तोवर शांतता मिळणार नाही असे म्हणत, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आशीर्वाद देणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी, भाईंदर येथील एका कार्यक्रमात गायीचा पुत्र बघायचा असेल तर एकनाथ शिंदेंकडे पाहा असे म्हणत त्यांना काऊज मॅन अशी उपमा दिली आहे.
भाईंदरमध्ये ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या भागवत सत्संग आणि सनातन संमेलनात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना स्वामींनी एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देऊन त्यांच्या कामाची स्तुती केली
स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, “गाय आई आहे, तर पुत्र कुठे आहे? असा प्रश्न विचारण्यात येत होता. तिचा तुम्ही आम्हाला असा प्रश्न विचारला तर आम्ही तुम्हाला सांगू की, तुम्हाला गायीचा पुत्र बघायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना पहा. हा गायीचा मुलगा आहे. सीएम म्हणजे मुख्यमंत्री नसून कॉमन मॅन असल्याचे एकनाथ शिंदे म्हणतात. मात्र, सीएम म्हणजे कॉमन मॅन नव्हे तर ‘काउज मॅन’असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या