मुंबई – मुंबईहून दुबईला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण तब्बल पाच तास रखडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पाच तास विमानातच अडकून पडावे लागल्याने प्रवासी विमानातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू लागले. याच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.एअर इंडियाच्या ए-१९०९ या विमानाचे काल सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण होणार होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाणाला ४ तास ४५ मिनिटे उशीर झाला. एवढा वेळ विमानात अडकून पडावे लागल्याने प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विमानातून खाली उतरवण्यात आले.
एअर इंडियाचे विमान ५ तास रखडल्याने प्रवासी संतापले
