उल्हासनगर – उल्हासनगरमध्ये आज पहाटे पाच वाजता एका कारने तीन ते चार वाहनांना धडक दिली. यात नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना उल्हासनगरच्या व्हिनस चौकात घडली. कार चालकाने भाजी आणण्यासाठी जात असलेल्या रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा उलटली. पुढे जाऊन कार चालकाने जंगल हॉटेल जवळ अॅक्टिव्हावर जाणारे दीपक पाटकर यांना उडवले. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हिनस चौकात चौथर्याला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले. यानंतर नागरिकांनी कारचालक आणि त्याचा मित्र या दोघांना बाहेर काढून मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दीपक पाटकर आणि रिक्षा चालक दशरथ मोरे यांना उपचारासाठी क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा कार चालकावर दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत करत आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |