सातारा- जिल्ह्यातील परळी, कास,सांडवली आणि अलवडी परिसरात सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने उरमोडी धरण पात्रात पाण्याची आवक वाढली आहे.त्यामुळे धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या हे धरण ९८.६१ टक्के भरले असून नदीपात्रात १ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पाणी सोडल्याने या नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.
उरमोडी धरणात काल सायंकाळपर्यंत ९.८२ टीएमसी इतका पाणीसाठा होता.काल दुपारी दोन वाजता या धरणाच्या सांडवा वक्र दरवाजातून ८,४५४ क्युसेकने विसर्ग सुरू झाला.
हा विसर्ग सायंकाळी १० हजार क्युसेक इतका करण्यात आला.धरणातून विसर्ग सुरू केल्याने उरमोडी नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कुणीही प्रवेश करू नये अशी सूचना धरण उपविभागीय अभियंता अमित तपासे यांनी केली आहे.