उरणमध्ये आठवड्यातून दोन दिवसांची पाणीकपात

उरण
पाणीसाठा जुलैपर्यंत पुरण्यासाठी उरण शहर आणि तालुक्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सुरू केली आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केले आहे.

एमआयडीसीच्या रानसई धरणातून उरण नगरपालिका, तालुक्यातील २१ गावे आणि एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस् या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. रानसई धरणाची उंची ही १२० फूट असली तरी धरणाच्या पाण्याची पातळी ही ११६.५ फुटांवर आहे.यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबर झालेल्या नागरीकरणामुळे भविष्यातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याची गरज आहे,उरण एमआयडीसीचे उपअभियंता जी.एन. सोनवणे म्हणाले की,रानसई धरणातील पाणी उन्हाळ्यात आणि जूनपर्यंत पुरवठा करता यावा याकरिता नियोजन म्हणून मंगळवारची पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी आठवड्यातील नेहमीची कपात आहे.याची सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top