Home / News / उरणजवळ डंपर धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

उरणजवळ डंपर धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

रायगड उरणनजीक जेएनपीए मार्गावर काल रात्री भरधाव डंपरने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडले. त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.नवी मुंबई...

By: E-Paper Navakal

रायगड उरणनजीक जेएनपीए मार्गावर काल रात्री भरधाव डंपरने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडले. त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.नवी मुंबई येथे राहणारे प्रथम म्हात्रे आणि साक्षी जाधव हे दोघे अन्य दोन मित्रमैत्रिणीसह लोणावळा येथे पिकनिकसाठी गेले होते. तेथून ते दुचाकीवरून घरी परतत होते. उरणनजीक टी पॉईंट येथे त्यांची दुचाकी आली असता जेएनपीएकडे जाणाऱ्या डंपरने पाठीमागून जोराची धडक दिली. दुचाकीवरील दोघेजण डंपरच्या पुढील चाकात सापडून गंभीर जखमी झाले. डंपरचालक गर्दीचा फायदा घेत डंपर सोडून फरार झाला. जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना म़त जाहीर केले.

Web Title:
संबंधित बातम्या