उमरगा- विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले धाराशीव जिल्ह्यातील उबाठाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण स्वामी यांना मातोश्री येथे येण्याचा निरोप मिळाला. त्यानुसार ते आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीच्या दिशेने जायला निघाले होते. त्यांच्यासह इतरही काही वाहने होती. उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे हे उमरग्यातील पदाधिकाऱ्यांसह यातील एका वाहनातून मुंबईकडे निघाले होते. यावेळी इंदापूर जवळ धुक्याने समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात बाबुराव शहापुरे गंभीर तर इतर पदाधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्याना हडपसरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उबाठा उमरगा तालुकाप्रमुख अपघातात गंभीर जखमी
