नवी दिल्ली – शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंका चतुर्वेदी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे,याची माहिती मिळत नाही. मात्र व्हिडिओतील संवादावरून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा हा व्हिडिओ आहे हे स्पष्ट होते.
हा व्हिडिओ एका मुलाखतीचा आहे. त्यात प्रियंका चतुर्वेदींना त्यांचे सर्वात आवडते राजकारणी कोण,असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना चतुर्वेदी काही क्षण विचारात पडल्याचे दिसते. पण लागलीच त्या थेट मोदींचे नाव घेतात. मोदींनी भाजपाला अशा स्थितीत नेऊन ठेवले की स्वबळावर केंद्रात सत्ता स्थापन करता येईल.ते एक ग्रेट राजकारणी आहेत,असे चतुर्वेदी म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.