जळगाव
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे जळगावमध्ये दाखल झाले. भुसावळ रेल्वे स्थानकावर खडसेंचे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे प्रेम माझा मागे असल्याने मला उत्साहाने काम करण्याची शक्ती मिळाली असल्याचे खडसेंनी सांगितले.
एकनाथ खडसेंना तीन आठवड्यांपूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला होता. त्यांना जळगावच्या डॉ. विवेक चौधरी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने मुबंईला हलविण्यात आले होते. मुंबईत बॉम्बे हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या वेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आपल्या जळगावामघील घरी पोहोचले.
उपचारानंतर खडसे जळगावात दाखल
