अहमदनगर – उद्धव ठाकरे यांनी कोपरगाव येथील काकडी गावातील बाजरी, सोयाबीन शेतीची आज पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या.
‘राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. दुबार पेरणी करूनही पिके उगवली नाहीत. बियाणे-खतांचा खर्च वाया गेलेला आहे. सप्टेंबर उजाडला तरी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच लागणार नाही. अशी सगळी परिस्थिती असताना सत्ताधारी ‘शासन आपल्या दारी’ नावाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुणी वाली उरलाय की नाही, अशी परिस्थिती आहे. पण शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. वेडेवाकडे पाऊल उचलू नये. मी फक्त आपल्याला आश्वासन द्यायला आलो नाही. मुंबईत जाऊन या सगळ्याचा मी पाठपुरावा करेन. शक्य तेवढी मदत मी आपल्याला मिळवून देईल, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी खचलेल्या शेतकऱ्यांना दिला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर
