नागपूर- विधानसभा निवडणूक निकालामध्ये आमदार उत्तम जानकर यांना माळशिरसच्या मारकवाडी गावात अपेक्षित मतदान झाले नसल्याने त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली होती.त्यानंतर मारकवाडी हे गाव देशभर चर्चेत आले. शरद पवार यांनी देखील मारकडवाडीला भेट देऊन तेथील लोकांशी चर्चा केली होती. आता येत्या ५ जानेवारीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे मारकडवाडीला भेट देणार आहेत. तर १० जानेवारीला काँग्रेस खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मारकडवाडीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी व मतदारांशी चर्चा करणार आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |