उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना धमकी

पुणे – मनसेपाठोपाठ वंचितची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश करणारे वसंत मोरे यांच्या भाचा प्रतिक कोडितकरांना फोनवरून मनसे कार्यकर्त्याने वसंत मोरेंना जीवे मारण्याची धमकी दिली. फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली.
या धमकीची माहिती वसंत मोरे यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट शेअर करत दिली. वसंत मोरेंचा भाचा प्रतिक कोडितकरला फोन करून मनसे कार्यकर्त्याने या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वसंत मोरे यांची विकेट पाडणार असल्याची धमकी दिली. तू पोलीस ठाण्यात माझी तक्रार कर. माझ्यावर आधीच १३ ते १४ गुन्हे दाखल आहेत. आणखी एक झाला तरी मला काही फरक पडणार नाही. गेलोच तर एखादा वर्ष मी तुरुंगात जाईन. मी वसंत मोरेची विकेट पाडणार म्हणजे पाडणार. मी मनसेचा कार्यकर्ता असून मनसेसाठी काम करतो, अशी धमकी वसंत मोरे यांना दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top