ठाणे – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनदेखील करणार आहेत. या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकर गटातील महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरेंची आज ठाण्यात जाहीर सभा
