मुंबई – राज्याचे उद्योगमंत्री शिंदे गटाचे उदय सामंत यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे नेहमीचे उत्तर मंत्री सामंत यांनी दिले.
उदय सामंत म्हणाले की, पुण्यातील मराठी भाषिकांच्या संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती राज ठाकरेंना केली होती. त्या विनंतीला मान देऊन ते संमेलनाला उपस्थित होते. त्याबद्दल आज त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतली. मराठी भाषा,दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यामुळे या भेटीला राजकीय रंग देऊ नये. ही भेट अतिशय साधी आणि सहज होती.