Home / News / उत्तर प्रदेशात कार अपघात ५ जण ठार! ६ गंभीर जखमी

उत्तर प्रदेशात कार अपघात ५ जण ठार! ६ गंभीर जखमी

लखनऊ – उत्तर प्रदेशातील श्रावस्ती इथे एका कार व टेंपोच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर ६ जण...

By: E-Paper Navakal

लखनऊ – उत्तर प्रदेशातील श्रावस्ती इथे एका कार व टेंपोच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळी इकौना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहनीपूर तिठ्यावर हा अपघात झाला. श्रावस्तीच्या राष्ट्रीय महामार्ग ७३० वर भरधाव वेगाने जात असलेल्या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्यानंतर दोन्ही वाहने रस्त्याकडील शेतात पडली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींची स्थिती नाजूक असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या