सेऊल- उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याने पुन्हा एकदा विष्ठाआणि कचऱ्याने भरलेले फुगे दक्षिण कोरियाच्या दिशेने सोडले.आता उत्तर कोरियाने सोडलेल्या फुग्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी दक्षिण कोरियाने केली आहे.त्यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे.
दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाविरुद्ध प्योंगयांगविरोधी प्रचार प्रसार पुन्हा सुरू केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी उत्तर कोरियाने ही कारवाई केली.दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने उत्तर कोरियाचे फुगे दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या उत्तरेकडे सीमा ओलांडल्यानंतर उडत असल्याची माहिती दिली. आहे.आकाशात फुग्यासोबत दिसणार्या वस्तूंपासून लांब रहा आणि जमिनीवर असा फुगा आढळल्यास पोलीस किंवा लष्करी अधिकार्यांना माहिती द्यावी, असे आवाहन दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने केले आहे.