सेऊल- उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग याने दक्षिण कोरियाला लागून असलेल्या आपल्या सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
किम जोंग याने सैन्याला तसे आदेश दिले आहेत. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्ध अभ्यासामुळे किम जोंग कमालीचा नाराज झाला आहे आणि याच नाराजीतून त्याने दक्षिण कोरिया – उत्तर कोरिया यांच्यातील सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यापुढे उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात एकही ट्रेन किंवा अन्य वाहन जाणार नाही. सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत . त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर कोरियाने आपल्या सर्व सीमांवर भूसुरूंग पेरलेले आहेत . दक्षिण कोरियाला लागून असलेल्या सीमा बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता आणि जानेवारीपासून त्याची तयारी सुद्धा सुरू होती . आज त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यात कमालीचा तणाव असून उत्तर कोरियाला शह देण्यासाठी दक्षिण कोरियाने अमेरिकेबरोबरचे संबंध अधिक दृढ केले होते . त्यानंतर अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात वेगवेगळे करार सुद्धा झाले होते . याच गोष्टीचा किम जोंग याला राग होता. त्यामुळे किम जोंग याने आपली शस्त्रास्त्र शक्ती वाढवण्यास सुरुवात केली . त्याने अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली . त्यामुळे तणाव अधिक वाढत गेला आणि आज त्याने दक्षिण कोरिया बरोबरची सीमा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
उत्तर कोरियाच्या किम जोंग कडून सीमाबंदी
