उत्तर काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर – उत्तर काश्मीरमधील बंदीपोराच्या सूम्लर परिसरातून साहित्य आणि 2 चिनी ग्रेनेडसह 2 संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली. अबरार अहमद वानी आणि दानिश परवेझ अशी त्यांची नावे असून हे दोघे लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या संघटनेशी संबंधित आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन दहशतवादींबाबत आम्हाला माहिती मिळाली होती. फिशरीज फार्म बंदीपोराजवळील या दोन संशयित दहशतवाद्यांना रोखले आणि पोलीस-लष्करी जवानांनी एकत्र कारवाई करत अटक केली. तपासणीत त्यांच्याकडून 2 चिनी ग्रेनेड आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले. दोघेही सूम्लर बंदीपोरा येथील रहिवासी आहेत.

सांबामध्ये भंगाराच्या
गोदामामध्ये स्फोट
सांबा जिल्ह्यातील बारीब्राह्मण येथील भंगाराच्या गोदामामध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची घटना आज घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Scroll to Top