चामोली – उत्तराखंडच्या चामोलीमध्ये हिमकडा कोसळून ५७ मजूर गाडले गेले होते. त्यातील ४८ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या ठिकाणी अडकलेल्या चार मजूरांचा मृत्यू झाला असून एकाचा जोशीमठ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एकाची स्थिती गंभीर आहे. इतर जखमी मजूरांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जोशीमठ येथे आणण्यात आले आहे. यातील ५ मजूरांचाही शोध घेतला जात आहे.उत्तराखंडमधमधील भारत चीन सीमाभागातील चामोली भागातली माणा कँपजवळ काल अचानक हिमकडा कोसळला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिमवृष्टीमुळे या मजूरांनी एका कंटेनरमध्ये आश्रय घेतला होता. या हिमकड्याखाली हा कंटेनर बर्फात दबला गेला. कालही यासाठी बचावकार्य केले गेले. बर्फवृष्टी व अंधारामुळे काल रात्री बचावकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळपासूनच हे बचाव कार्य पुन्हा सुरु झाले. कालपासून बचाव दलाला जौलीग्रांट, सहस्त्रधारा व गोचर इथे तैनात करण्यात आले होते. आज सकाळी त्यांच्या हेलिकॉप्टरांनी सुरक्षा व बचाव उपकरणांसह घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांनी या मजूरांना बाहेर काढले. त्यांना तातडीने जोशीमठ येथे आणण्यात आले. यावेळी एका मजूराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यातील काहींना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात भरती करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली. भारतीय लष्कर, एनडीआरएफ आणि वायुदालाच्या जवानांनी हे बचावकार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी बचावकार्याबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही जोशीमठ येथे जाऊन वाचवलेल्या मजूरांची विचारपूस केली.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या ४८ मजूरांना वाचवण्यात यश ५ जणांचा मृत्यू
