उत्तरकाशी – उत्तराखंडमधील उत्तर काशीच्या डोंगराळ भागात भूकंपाचे एका पाठोपाठ एक असे तीन धक्के जाणवले. यामुळे वरुणावत पर्वतावर भूस्खलन झाले.रिक्टर स्केलवर उत्तराखंडमध्ये सकाळी पावणेआठ, ८ वाजून १९ मिनिटांनी व १० वाजून ५९ मिनिटांनी असे तीन धक्के बसले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.५ इतकी मोजण्यात आली. या भूकंपाने वरुणावत पर्वतावर झालेल्या भूस्खलनामुळे डोंगरावरुन दगड मातीचे ढिगारे कोसळले. या भूकंपांमुळे कोणतीही जिवीतहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. एका पाठोपाठ बसलेल्या भूकंपाच्या तीन धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
उत्तरकाशीत भूकंपाचे धक्के वरुणावत पर्वतावर भूस्खलन
