ई-रिक्षा पुन्हा सुरू करण्याच्या
मागणीसाठी आज \’माथेरान बंद\’

माथेरान – माथेरानमध्ये तीन महिने यशस्वीपणे सुरू असलेली पर्यावरण पूरक ई रिक्षा बंद करण्यात आली. ही सेवा पुन्हा सुरू व्हावी आणि माथेरान मधील रस्त्यांची थांबलेली कामे पूर्ण व्हावीत या मागणीसाठी उद्या शुक्रवार १७ रोजी माथेरान बंद ठेवले जाणार आहे. सकाळी १० वाजता श्री राम मंदिर येथून माथेरान पर्यावरण संवेदनशील फोरमच्या माध्यमातून माथेरान अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. माथेरान पर्यावरण संवेदनशील फोरममार्फत हा मोर्चा काढला जाईल.
फोरमच्या माध्यमातून नवी दिल्ली येथील सर्वोच्य न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत आपली बाजू मांडण्यासाठी चांगले वकिलांचे पॅनल देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. माथेरान मधील सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाला दोन महिने स्थगिती देण्यात आली आहे हे लक्षात घेऊन ही स्थगिती न्यायालयाने उठवावी आणि माथेरान मधील धूळ विरहित रस्त्यांमध्ये रूपांतर करण्याची सुरू असलेली कामे पूर्ण करावीत यासाठी तसेच शासनाने राबविलेल्या पायलट प्रोजेक्टच अहवाल लवकरात लवकर सादर करावा या मागणी नुकतीच या फोरम कडून ग्रामस्थांची एक बैठक गुजरात भवन हॉटेल येथे घेण्यात आली होती.

Scroll to Top