प्रयागराज – अंबानी उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांनी आज महाकुंभात पवित्र स्नान केले. यावेळी त्यांचे पती आनंद पिरामलही त्यांच्यासोबत होते.
ईशा अंबानी यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्नान केले यावेळी तिथे पिरामल कुटुंबियही उपस्थित होते. ते काल हेलिकॉप्टरने प्रयागराजला आले. यावेळी त्यांनी गंगाआरती व पूजाअर्चाही केली. ११ फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांनी आपल्या मातोश्री व इतर कुटुंबियांसोबत महाकुंभात स्नान केले होते.
ईशा अंबानी यांनी केले महाकुंभात पवित्र स्नान
