श्रीहरिकोटा-श्रीहरिकोटा येथून इस्रोने नुकतेच पीएसएलव्ही रॉकेटद्वारे महत्त्वाकांक्षी स्पाडेक्सने उड्डाण केले होते. या स्पेडेक्सची होणारी डॉकिंग चाचणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी स्पेडेक्स डॉकिंग चाचणी मंगळवारी होणार होती. मात्र आता ही चाचणी ९ जानेवारीला होणार असल्याची माहिती इस्रोने आज एक्सवरून दिली. मात्र इस्रोने चाचणी पुढे ढकलण्याचे कारण सांगितले नाही.इस्रोने ३० डिसेंबर रोजी सीडीएक्स०१ (चेझर)आणि सीडीएक्स०२ (लक्ष्य)हे दोन लहान उपग्रह श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते.या मिशनमध्ये पीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात दोन छोट्या यानांचे डॉकिंग म्हणजे जोडणे आणि अनडॉक करणे म्हणजे वेगळे करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे हा इस्रोच्या या मोहिमेचा उद्देश आहे.
इस्रोने स्पेडेक्स डॉकिंग चाचणी पुढे ढकलली
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/spadex-mission-sriharikota-1024x768.jpg)