नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो अंतराळ क्षेत्रात सतत चांगली कामगिरी करत आहे. यातच शनिवारी इस्रोने श्रीहरिकोटा येथून सिंगापूर या दोन उपग्रहांसह आपला पीएसएलव्ही- सी५५ प्रक्षेपित केला.हे अभियान पूर्णपणे यशस्वी झाले आहे. इस्रोच्या या यशाबद्दल त्याचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी आनंद व्यक्त केला आहे.या यशस्वी मिशनसाठी एस. सोमनाथ यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
इस्रोच्या कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना संबोधित करताना एस.सोमनाथ म्हणाले की, अभिनंदन,पीएसएलव्ही- सी५५ आणि टेलिओस-२ मोहीम यशस्वी झाली.दोन्ही उपग्रह आपापल्या कक्षेत व्यवस्थित पोहोचले आहे.या मोहिमेत प्रायमरी उपग्रह टेलिओस-२ प्रक्षेपित करण्यात आला.त्याचे वजन ७४१ किलो आहे.याशिवाय दुसरा उपग्रह ल्युमलाईट -४ हा १६ किलो वजनाचा आहे. रॉकेटने दोन्ही उपग्रहांना पूर्वेकडे झुकलेल्या कक्षेत पोहोचवले आहे.याबाबत इस्रोने माहिती दिली की, टेलिओस-२ हे सिंगापूर सरकार आणि सिंगापूर टेक्नॉलॉजीज इंजिनियरिंग लिमिटेड यांच्यातील भागीदारी अंतर्गत विकसित केले गेले आहे.
एकदा हा उपग्रह पूर्णपणे कार्यान्वित झाला की,तो इमेजरी आवश्यकता पूर्ण करेल.तसेच ल्युमलाईट -४ इन्स्टिट्यूट फॉर इन्फोकॉम रिसर्च आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.शहर-राज्याची सागरी सुरक्षा वाढवणे हे याचे उद्दिष्ट आहे. पीएसएलव्ही- सी ५५ रॉकेटने दोन उपग्रहांसह परिभ्रमण प्रायोगिक मॉड्यूल पीओईएमही सोबत नेले.पीओईएमचे पूर्ण रूप पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल पीओईएम मॉड्यूल हे प्रक्षेपण वाहन पीएसएलव्ही- सी५५ चा चौथा टप्पा आहे. याचा वापर शास्त्रज्ञांना कक्षेत प्रयोग करण्यासाठी केला जाणार आहे.
इस्रोची अभिमानास्पद कामगिरी! सिंगापूरच्या २ उपग्रहांचे प्रक्षेपण
