तेलअवीव – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायल संरक्षण दलाच्या लष्कर प्रमुखपदी निवृत्त मेजर जनरल इयाल जमीर यांची नियुक्ती केली. इयाल जमीर हे लेफ्टनंट जनरल हरजी हालेवी यांची जागा घेणार आहेत. ते ६ मार्च रोजी आपले पद स्वीकारतील. याबाबतची माहिती इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट करून दिली.संरक्षण मंत्री इस्रायल कॅटझ यांनी जमीर यांच्याव्यतिरिक्त लष्कर प्रमुखपदासाठी मेजर जनरल अमीर बराम आणि मेजर जनरल तामीर यादाई यांचीही नावे दिली होती. मात्र नेतन्याहू यांनी जमीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर हरजी हालेवी यांनी जमीर यांचे अभिनंदन केले. इस्रायली लष्करात २८वर्षे सेवा केलेले इयाल जमीर पुन्हा लष्कराची कमान सांभाळतील. ते म्हणाले की, मी इयालला अनेक वर्षांपासून ओळखतो आणि मला विश्वास आहे की, ते पुढील आव्हानांमध्ये चांगली कामगिरी करतील. या जबाबदारीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.
इस्रायलच्या लष्कर प्रमुखपदी इयाल जमीर यांची नियुक्ती
