तेल अवीव – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर आज पहाटे हिजबुल्लाने ड्रोन हल्ला करण्यात आला.या वृत्ताला इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानेही दुजोरा दिला. हल्ला झाला तेव्हा नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा घरी नव्हते,या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही,अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.इस्रायलच्या लष्कराने (आयडीएफ) सांगितले की, लेबनॉनमधून काल रात्री इस्रायलवर तीन ड्रोन हल्ले करण्यात आले.त्यापैकी एक सिझेरिया शहरातील इमारतीवर आदळले. सिझरिया हे पंतप्रधान नेतन्याहू यांचे वडिलोपार्जित निवासस्थान आहे.बाकीची दोन ड्रोन मोकळ्या जागी येऊन पडली. त्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार आज पहाटेपासून लेबनॉनमधून तिबेरिया आणि आसपासच्या भागांना लक्ष्य करीत ड्रोन आणि रॉकेट हल्ले करण्यात आले. त्यातील अनेक रॉकेट गॅलिसिया समुद्रात कोसळली. त्यामुळे कोणीही जखमी झाला नाही.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला
