तेल अविव
गाझा पट्टीमध्ये संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या शाळेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या शाळेत पॅलेस्टिनी शरणार्थींनी आश्रय घेतला होता. हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये लहान मुले आणि काही महिलांचाही समावेश आहे.
या हल्ल्यानंतर वर्गांमध्ये मृतदेहांचा ढीग पडलेला दिसला.
याशिवाय भिंतींवर बंदुकींच्या गोळ्यांमुळे अनेक छिद्रे झाली आहेत, तर वर्गांचे छत फुटले आहे. या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्यांची एकूण संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. हा हल्ला झाला तेंव्हा या शाळेमद्ये हजारो शरणार्थ्यांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्याबद्दल कतार आणि इजिप्तने इस्रायलला जबाबदार धरले आहे. इस्रायलकडून गाझा पट्ट्यामध्ये मानवतावादी मूल्ल्यांचे उल्लंघन केले जात आहे, तसेच उल्लंघन या शाळेवरील हल्ल्यातूनही दिसून आल्याचे इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींनी गाझामध्ये जाऊन तेथील शाळांना कसे लक्ष्य केले आहे, याची पाहणी करावी आणि या शाळेवरील हल्ल्याचा त्रयस्थांकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी कतारने केली आहे.